आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची 'पिडा':एकनाथ खडसेंच्या पत्नीला पुन्हा एकदा ईडीने बजावला समन्स; चौकशीसाठी उद्या हजर राहण्यास सांगितले

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदाकिनी खडसे यांना ईडीने यापूर्वीही हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडी मार्फत पुन्हा नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात ही नाटीस बजावली आहे. उद्या म्हणजेच बुधवारी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना या नाटिसमध्ये देण्यात आल्या आहेत.

मंदाकिनी खडसे यांना ईडीने यापूर्वीही हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्या हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी ईडीला कळवले होते. यानंतर ईडीने पुन्हा नोटीस बजावत बुधवारी सर्व कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिल्या आहेत. या प्रकरणामध्ये गेल्या आठवड्यात जिल्हा सहकारी बँकेला देखील ईडीने नोटीस बजावली होती. यामध्ये त्यांनी संत मुक्ताई शुगर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते.

यासोबतच भोसरी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या कोठडीत आहेत. तर एकनाथ खडसे यांची देखील या प्रकरणात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता खडसेंच्या पत्नींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...