आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन व भत्ता:महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना 43 कोटी 65 लाख मिळणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी ४३ कोटी ६५ लाख २२ हजार रुपये वितरित करण्यात आले. हा निधी नियमित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या २०२२-२३ मधील मंजूर व अनुज्ञेय वेतन भत्त्यासाठी वापरावा. यापूर्वीच्या कोणत्याही थकबाकीसाठी या निधीचा वापर करू नये. निधीचा अन्य बाबींवरील खर्च अनियमितता समजण्यात येईल असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला गेल्या काही वर्षांत ऊर्जितावस्था आली असून औरंगाबादसह काही महापालिका, नगरपालिकांसाठी हे प्राधिकरण काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

बातम्या आणखी आहेत...