आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती होऊनही अधिकारी पदभाराच्या प्रतीक्षेत:डीआरडीएचे नवनियुक्त प्रकल्प संचालक बोटे यांना 7 दिवसांपासून ठेवले तिष्ठत

सुधाकर जाधव । जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या ग्रामविकास विभागाने 30 डिसेंबरला जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांच्या रिक्तपदी बी.ए.बोटे या अधिकाऱ्याची 30 डिसेंबरला रोजी नियुक्ती केली. त्यांना पदभार देण्याऐवजी सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची त्यांना भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मंत्री महाजन यांची भेटही घेतली. मात्र, नियुक्तीनंतर सात दिवसांचा कालावधी लोटला तरी बोटे यांना पदभार देण्यात आलेला नाही.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या तत्कालीन प्रकल्प संचालक मिनल कुटे यांची 28 डिसेंबर रोजी विकास उपायुक्त म्हणून नागपूरला बदली झाली आहे. त्यावेळी ग्रामविकास विभागाने कुटे यांच्या रिक्त झालेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी कुणाची नियुक्ती ग्रामविकास विभागाने केली नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार उपमुख्य अधिकारी (ग्रामपंचायत) बाळासाहेब मोहन यांनी डीआरडीएच्या प्रकल्प संचालक पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारला. त्यानंतर त्या विकास उपायुक्तपदी रुजू झाल्या. दरम्यान, 30 डिसेंबरला ग्रामविकास विभागाने जळगाव जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी अकोला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांची नियुक्ती केली.

नियुक्ती झाल्यानंतर ते पदभार घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ आशिया यांच्याकडे गेले होते. आशिया यांनी त्यांना पदभार देण्याऐवजी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची भेट घ्यायला सांगितले. त्यानुसार बोटे यांनी मंत्री महाजन यांची भेटही घेतली. मात्र,नियुक्ती होवून सात दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांच्याकडेच आहे.

पुन्हा घेणार मंत्र्यांची भेट...

दरम्यान, बोटे यांनी एकवेळा मंत्री महाजनांची भेट घेतली. आता पुन्हा ते मंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांना प्रकल्प संचालकपदाचा पदभाराचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती मिळाली.

बोटे पुन्हा जळगाव जिल्ह्यात...

बोटे हे जळगाव जिल्हा परिषदेत 2017 पासून तीन वर्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) होते. जळगावातून त्यांची बदली अकोला येथे झालेली होती. आता पुन्हा जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

बोटे जळगावला आले नाहीत....

माझ्याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त पदभार आहे. या पदावर बी.ए.बोटे यांची नियुक्ती झालेली आहे. अद्यापही या पदाचा अतिरिक्त पदभार माझ्याकडे आहे. बोटे जळगावला आले नाहीत. त्यांना रुजू करुन घेण्याबाबतचा निर्णय सीईओ घेतील.

- बाळासाहेब मोहन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषदेत हजर झालो....

नियुक्ती झाल्यानंतर सोमवारी जळगाव जिल्हा परिषदेत हजर झालो. दिवसभर जि.प.मध्ये होतो. रुजू झाल्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद व डीआरडीएला दिला आहे. पदभार अद्याप घेतलेला नाही.

- बी.ए.बोटे, प्रकल्प अधिकारी

बातम्या आणखी आहेत...