आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणच्या क्रीडा स्पर्धेचा जंगी समारोप:पुणे-बारामती, नागपूर-चंद्रपूर-गोंदियास संयुक्त विजेतेपद; 1083 खेळाडूंनी गाजवले मैदान

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांनी संयुक्तरित्या सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला. जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलावर या चारदिवसीय स्पर्धेचा समारोप झाला.

सर्वाधिक ६२ गुण मिळविणाऱ्या पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलांच्या संघांना सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आले. महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनीही टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत विजेत्या संघांचे कौतुक केले.

बक्षीस वितरण उत्साहात

बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कार्यकारी संचालक (वितरण/मानव संसाधन) अरविंद भादीकर, स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता कैलास हुमणे (जळगाव), भुजंग खंदारे (मुख्यालय), राजेंद्र पवार (पुणे), मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची उपस्थिती होती.

हजाराच्यावर खेळाडू

पाहुण्यांच्या हस्ते सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यातील 16 परिमंडलांचे नाशिक-जळगाव, औरंगाबाद-लातूर-नांदेड, कल्याण- रत्नागिरी, सांघिक कार्यालय-भांडूप, नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, अकोला-अमरावती, पुणे-बारामती व कोल्हापूर अशा 8 संयुक्त संघांतील 730 पुरुष व 353 महिला असे एकूण 1083 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.

सांघिक खेळांचे निकाल

अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट - पुणे-बारामती व नाशिक-जळगाव, व्हॉलिबॉल - कोल्हापूर व औरंगाबाद-नांदेड-लातूर, कबड्डी (पुरुष)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, कबड्डी (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर, खो-खो (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, टेबल टेनिस (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, टेबल टेनिस (महिला)- अकोला-अमरावती व कोल्हापूर, बॅडमिंटन (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व औरंगाबाद-नांदेड-लातूर, बॅडमिंटन (महिला)- पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, कॅरम (पुरुष)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व पुणे-बारामती, कॅरम (महिला)- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व कोल्हापूर, ब्रिज- औरंगाबाद-नांदेड-लातूर व नाशिक-जळगाव, टेनिक्वाईट महिला- नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व औरंगाबाद-नांदेड-लातूर.

वैयक्तिक खेळांचे निकाल

अनुक्रमे विजेते व उपविजेते असे (कंसात संघ) - 100 मीटर धावणे - पुरुष गट - साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप) व गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट - प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), 200 मीटर धावणे - पुरुष गट - गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट - सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व भूमिका भोयर (कोल्हापूर), 400 मीटर धावणे - पुरुष गट - विजय भारे (नाशिक-जळगाव) व प्रदीप वंजारे (कोल्हापूर), महिला गट - श्वेतांबरी अंबाडे (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय-भांडूप), 800 मीटर धावणे - पुरुष गट - प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व परेश चौधरी (नाशिक-जळगाव), महिला गट - श्वेतांबरी अंबाडे (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप), 1500 मीटर धावणे - पुरुष गट - प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व शुभम मात्रे (अकोला-अमरावती), महिला गट- अर्चना भोंग (पुणे-बारामती) व प्रेरणा रहाटे (सांघिक कार्यालय-भांडूप), 5000 मीटर धावणे - पुरुष - प्रफुल्ल राऊत (कल्याण-रत्नागिरी) व सचिन खटावकर (कोल्हापूर).

4 बाय 100 रिले

पुरुष गट - प्रदीप वंजारे, शुभम निंबाळकर, नरेश सावंत, संभाजी जाधव (कोल्हापूर) व प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, कृष्णा लाड, गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट - प्रिया पाटील, सोनिया मिठबावकर, अश्विनी शिंदे, सारिका जाधव (सांघिक कार्यालय-भांडूप) व सुप्रिया लुंगसे, अर्चना भोंग, शर्वरी तिवटणे, माया येळवंडे (पुणे-बारामती).

गोळा, भाला फेक

पुरुष गट - प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व हणमंत कदम (कोल्हापूर), महिला गट - स्नेहा सपकाळ (सांघिक कार्यालय-भांडूप) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), थाळी फेक - पुरुष गट - प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व धर्मेश पाटील (नाशिक-जळगाव), महिला गट- ज्योती कांबळे (कोल्हापूर) व संगीता यादव (औरंगाबाद-नांदेड-लातूर), भाला फेक - पुरुष गट - सचिन चव्हाण (कोल्हापूर) व नारायण मुंजाळ (औरंगाबाद-नांदेड-लातूर), महिला गट - सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अश्विनी जाधव (कोल्हापूर).

लांब, उंच उडी

पुरुष गट - सोमनाथ कांतीकर (पुणे-बारामती) व मनोज धोंडगे (नाशिक-जळगाव), महिला गट - सरिता सरोटे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व माया येळवंडे (पुणे-बारामती), उंच उडी - पुरुष गट - चेतन केदार ( नाशिक-जळगाव ) व महेश नागटिळक (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला गट - सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप) व अश्विनी देसाई (कोल्हापूर).

बुद्धिबळ, टेनिक्वाईट

पुरुष गट - अजय पंडित (पुणे-बारामती) व सौरभ माळी (कोल्हापूर), महिला गट - अमृता जोशी (सांघिक कार्यालय-भांडूप) व मोना बरेला (नाशिक-जळगाव), कॅरम - पुरुष गट - अनंत गायत्री (सांघिक कार्यालय-भांडूप) व इक्बाल खान (औरंगाबाद-नांदेड-लातूर), महिला गट - तेजश्री गायकवाड (सांघिक कार्यालय-भांडूप) व पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), टेनिक्वाईट - महिला एकेरी - लीना पाटील (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व मनीषा चौकसे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी - शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती) व पल्लवी गायकवाड-भाग्यश्री कदम (औरंगाबाद-नांदेड-लातूर).

टेबल टेनिस

पुरुष एकेरी - रितेश सव्वालाखे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व शकील शेख (कोल्हापूर), पुरुष दुहेरी - रितेश सव्वालाखे - प्रमोद मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व मंगेश प्रजापत-कैलास जमदडे (नाशिक-जळगाव), महिला एकेरी - स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला दुहेरी- स्नेहल बढे-मनीषा बुरांडे (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे-सायली कांबळे (सांघिक कार्यालय-भांडूप),

बॅडमिंटन

पुरुष एकेरी - पंकज पाठक (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व लोकेश तळवेकर (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), पुरुष दुहेरी - पंकज पाठक-चेतन चौधरी (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व इम्रान तासगावकर-गणेश काकडे (पुणे-बारामती), महिला एकेरी - वैष्णवी गांगारकर (पुणे-बारामती) व ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला दुहेरी - वीणा सगदेव- ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व विदुला पाटील-चैत्रा पै (कोल्हापूर), ब्रिज- पंकज आखाडे-महेश मेश्राम (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व प्रशांत गोंधळेकर-प्रशांत गायकवाड (अकोला-अमरावती),

कुस्तीतले विजेते

कुस्ती - 57 किलो - आकाश लिंभोरे (पुणे-बारामती) व गोरख रानगे (कोल्हापूर), 61 किलो - विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व सुखदेव पुजारी (कोल्हापूर), 65 किलो - राजकुमार काळे (पुणे-बारामती) व सूर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव), 70 किलो - उत्तम पाटील (कोल्हापूर) व महादेव दहिफळे (औरंगाबाद-नांदेड-लातूर), 74 किलो -गुरुप्रसाद देसाई (औरंगाबाद-नांदेड-लातूर) व अकील मुजावर (पुणे-बारामती), 79 किलो - संदीप नेवारे (अकोला-अमरावती) व युवराज निकम (कोल्हापूर), 86 किलो - अमोल गवळी (पुणे-बारामती) व भूषण चौधरी (नाशिक-जळगाव), 92 किलो - वैभव पवार (पुणे-बारामती) व महेंद्र कोसारे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) , 97 किलो - मोहंमद अन्वर (अकोला-अमरावती) व प्रमोद ढेरे (कोल्हापूर) आणि 125 किलो - भानुदास विसावे (नाशिक-जळगाव) व हणमंत कदम (कोल्हापूर).

राज्यभरातून आले अधिकारी

स्पर्धेसाठी राज्यभरातून अधिकारी आले होते. त्यात अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के (जळगाव), अनिल बोरसे (नंदुरबार), कैलास जमदडे (अहमदनगर), सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमीलाल राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) देवेंद्र कासार, अमित सोनवणे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, रमेशकुमार पवार, प्रदीप सोरटे, राम चव्हाण, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, अनुभूती शाळेचे क्रीडा संचालक अरविंद देशपांडे हेही मंचावर होते. सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...