आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबरा यांनी स्वीकारला पदभार‎:माहेश्वरी संघटनेने पदग्रहणात विधवा,‎ अनाथ महिलांना दिला मदतीचा हात‎

जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेश्वरी महिला संघटनेच्या शहर व‎ तालुक्याचा पदग्रहण सोहळा रविवारी‎ महेश प्रगती मंडळात झाला. या वेळी‎ संघटनेतर्फे विधवा व अनाथ‎ महिलांसाठीच्या महेश सेवा निधीला २१‎ हजार रुपये देण्यात आले.‎ पदग्रहण सोहळ्यात महेश वंदना‎ राणी लाहोटी यांनी सादर केली. त्यानंतर‎ तीन वर्षांसाठी कार्यकारिणीची निवड‎ करण्यात आली. चंचल तापडिया यांनी‎ नूतन अध्यक्षा व अरुणा मंत्री यानी नूतन‎ सचिव याना पदभार सोपवला. या वेळी‎ ज्याेत्स्ना लाहोटी, सुमती नवाल, उषा‎ कासट, मनीषा तोतला, मंगला भदादा,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुनंदा सोमाणी आदी उपस्थित होते.‎ सीमा धूत यांनी सूत्रसंचालन केले.‎

कार्यक्रमात यांनी स्वीकारला‎ पदभार : साेहळ्यात तालुकाध्यक्षपदी‎ पुष्पा दहाड, सचिव कल्पना काबरा,‎ उपाध्यक्ष अरुणा मंत्री, अनिता भुतडा,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सहसचिव सरला पोरवाल, सीमा धूत,‎ कोषाध्यक्ष राणी लाहोटी, कार्याध्यक्ष‎ निधी भट्टड, संघटन मंत्री ज्योती मंडोरा,‎ प्रचार प्रमुख श्रीकांत मनियार,‎ सल्लागार गौरी बिर्ला, किरण झंवर‎ यानी पदभार स्वीकारला.‎

बातम्या आणखी आहेत...