आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील वाकाेद -पहुर परिसरात 25 मिलिमिटर पाऊस झाला. पावसाचा जाेर आणि वादळामुळे भारुडखेडा सबस्टेशनला जाेडणाऱ्या मुख्य विजवाहिनीचा खांब काेसळला. त्यामुळे परिसरातील संपुर्ण 5 ते 7 गावांमध्ये विजपुरवठा खंडीत झाला अाहे.
शनिवारी रात्री जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात 25 मिलिमिटर, पाराेळ्यात 18 मिलिमिटर तर एरंडाेलमध्ये 28 मिलिमिटर पावसाची नाेंद करण्यात आली. जिल्ह्यात अन्य ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. जामनेर तालुक्यात पावसाचा जाेर अधिक हाेता. साेबत वादळ देखील असल्याने शेतीचे माेठे नुकसान झाले. ताशी 40 ते 50 किमी वाऱ्यामुळे पत्रे उडाली. झाडे देखील पडली. पाऊस अधिक झाल्याने काळ्या मातीमध्ये राेवलेल्या विजेचे खांब वाकले आहेत.
पहुर-वाकाेद रस्त्यावर एका शेतात मुख्य वीज वाहिनीचा खांब पडल्याने रात्री विजपुरवठा खंडीत झाला हाेता. महावितरणकडून तातडीने मेंन्टनन्सचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतात चिखल असल्याने विजेचे खांब नव्याने उभे करण्यासाठी अडचणी येत आहोत. रविवारी दिवसभरात हे मार्गी मार्गी लावले जाणार आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळित हाेवू शकताे, असे यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.