आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकजुट:सामाजिक सलोखा टिकवून‎ ठेवा; एकजुटीने काम करावे‎

जळगाव‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ तांबापुरात होणाऱ्या तणावाच्या‎ स्थितीत तुम्हीच पुढाकार घ्या.‎ जातीय सलोखा टिकवण्यासाठी‎ एकजुटीने काम करा. संपूर्ण राज्यात‎ जळगाव पॅटर्न म्हणून आपले‎ वर्चस्व सिद्ध करा, असे आवाहन‎ पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी‎ शांतता समितीच्या बैठकीत केले.‎ सोमवारी एमआयडीसी पोलिस‎ ठाण्यात ही बैठक घेण्यात आली.‎ तांबापुरात महिनाभरात दोन‎ जातीय दंगली झाल्या. या‎ पार्श्वभूमीवर नागरिकांत एकोपा‎ निर्माण करण्यासाठी बैठक घेण्यात‎ आली. या भागात सीसीटीव्ही कॅमेरा‎ बसवण्याबाबत आवाहन करण्यात‎ आले.

सध्या सुरू असलेल्या नूपुर‎ शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून‎ शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न‎ निर्माण होऊ देऊ नये याबाबत‎ सूचना केल्या. या बैठकीत‎ शिवसेनेच्या शोभा चौधरी,‎ राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक‎ लाडवंजारी, नगरसेवक इब्राहिम‎ पटेल, मनियार बिरादरीचे फारुख‎ शेख अब्दुल्ला, नगरसेवक गणेश‎ सोनवणे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष‎ अहेमद सर, नगरसेवक जिया‎ बागवान, मनोज आहुजा, रागीब‎ अहमद, अनिस शाह, दानिश‎ अहमद, सलीम इनामदार, आसिफ‎ शाह, वाहिद शेख, रियाज काकर,‎ संजय जाधव, किरण राजपूत, रहीम‎ तडवी आदी उपस्थित होते.‎ एमआयडीसी पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे.‎

बातम्या आणखी आहेत...