आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचे सावट:तीन दिवसांत वावटळीच्या वाढत्या वेगाने मका, केळीच्या बागांना धोका; तीन दिवसांत वावटळीच्या वाढत्या वेगाने मका, केळीच्या बागांना धोका

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यावर आजपासून पुढील चार दिवस मध्य अवकाळी पावसाचे सावट आहे. तापमान ४३ अंशांपुढे गेलेले असताना अवकाळीचे सावट उभे राहिले आहे. या वाऱ्याचा वेग ताशी २८ किमीपर्यंत तर वाऱ्याची झुळूक, वावटळींचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा आपत्तीपासून केळी, मका, गहू या पिकांना वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.

मंगळवारपासून उत्तर-मध्य महाराष्ट्रात वातावरण ढगाळ असेल. ५ ते ७ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होईल. या काळात तापमान मात्र ४२ ते ४३ अंशांच्या जवळपास राहणार आहे. तापमान कायम असताना पावसाची शक्यता असल्याने विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळही निर्माण होण्याची शक्यता आहे. स्थानिक वातावरणात तयार होणाऱ्या वादळाचा ताशी वेग ४० ते ५० किमीपर्यंत असू शकतो. या स्थितीत अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने केळी, मका, गहू ही पिके आडवी पडू शकतात. पावसापेक्षाही वादळांमुळे होणारे नुकसान अधिक हानी करणारे ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...