आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाने घेतला निर्णय:अमृतच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ‘मजीप्रा’ करणार व्यवस्थापन ; मनपासाेबत लवकरच करारनामा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून सेवा देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मनपासाेबत करारनामा करून याेजनेचा डीपीआर तयार करण्याचा मार्ग माेकळा हाेईल.राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांत अमृत २.० साठी डीपीआर तयार करून शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे; परंतु जळगावात गुंतागुंत निर्माण झाली आहे. मनपाने यापूर्वी नियुक्त केलेल्या एजन्सीने वेळेत व सविस्तर डीपीआर तयार न केल्याने मनपाने मजीप्रामार्फत डीपीआर तयार करण्याची तयारी केली हाेती.

त्यासाठी गेल्या महिन्यात मजीप्रला पत्र पाठवून ते प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करण्यास तयार आहेत का? अशी विचारणा केली हाेती. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाने नाशिक मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून परवानगी दिली आहे. डीपीआरसाठी मजीप्रामार्फत पीएमसीचे काम करताना खासगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याबाबत यथावकाश निर्णय घेतला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...