आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • MakarSankranti | Marathi News | Jalgaon | Suicide | Death | Rope Of Life Of Both Was Cut At Sankranti; The Kite Got Stuck In The Power Line, The 'Kuldeepak' Went Out Due To Shock While Removing It

कुलदीपक विझला:संक्रांतीला कापली गेली दोघांच्या आयुष्याची दोरी; वीजतारांत पतंग अडकला, काढताना शॉक लागल्याने ‘कुलदीपक’ विझला

जळगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्येत ठीक नसल्याने बहिणीने पतंग देण्यास नकार दिल्याने बारावर्षीय हट्टी भावाने घरातच झोक्याच्या दोरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली.

कुसुंबा गावातील गणपतीनगरात हितेश ओंकार पाटील (वय ८) हा बालक संक्रातीनिमित्त शुक्रवारी सकाळी लहान मुलांसोबत पतंग उडवत होता. घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका दुमजली घराचे बांधकाम सुरु आहे. त्या घरावरुन उच्च दाबाच्या वीजतारा गेलेल्या आहेत. त्यात त्याचा पतंग अडकला. तो काढण्यासाठी छतावर गेला असताना वीजतारांना स्पर्श झाल्याने त्याला शॉक लागला.

ही घटना गावातील एका प्लंबरने बघितली. त्याने आरडओरड केली. त्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. बापू ढाकणे यांनी जबर जखमी हितेशच्या छातीवर पंपींग करुन प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. शासकीय रुग्णालयात तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हितेशला शॉक लागला असून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याची माहिती कुसुंबा येथील समाज माध्यमांवरील ग्रुपवर टाकण्यात आली होती.

मोबाइलवर मुलाचा फोटो पाहून आई-वडिल व नातेवाइक शासकीय रुग्णालयात आले. सकाळी पतंग खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलाचा आई-वडिलांना थेट मृतदेहच दिसला.त्यानंतर त्यांनी आक्रोश केला. हितेश हा एकुलता मुलगा होता.

जळगाव | शहरातील कांचननगर भागातील चौघुले प्लॉटमध्ये रमेश राजपूत हे राहतात. बाजार समितीत बारदान शिवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी मोलकरणीचे काम करते. दोघे जण त्यांच्या कामधंद्यासाठी सकाळी साडेसात वाजताच घराबाहेर पडले. मुलगा यश व त्याची मोठी बहीण सोनी हे दोघेही घरीच होते. सोनी ही घरासमोर धुणे धूत होती. भाऊ यश हा तिच्याकडे संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यासाठी मागत होता.

त्याची तब्येत ठीक नसल्याने घरात आराम कर असे सांगून तिने त्याला नकार दिला. त्यानंतर बहिणीने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत त्याला थांबायला सांगून बाहेरून दरवाजा लावून घेतला व कपडे धुण्यासाठी ती निघून गेली. सकाळी १०.३० वाजता तिने दरवाजा उघडून बघितला तर यश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. आरडाओेरड केल्यानंतर शेजारी धावले.

त्यांनी त्याला खाली उतरवले. शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. बहीण सोनीने घडलेला प्रकार कथन केला. शनिपेठचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे व कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले होते. यश हा दोन बहिणींचा एकूलता एक लाडका भाऊ होता.

हाताला घट्ट गुंडाळलेला होता नायलॉन मांजा
प्राणज्योत मालवल्यानंतर हितेशचे डोळे उघडे होते. त्याच्या निरागस कलेवराकडे पाहून वडिल ओंकार पाटील यांनी ‘कसा बघतोय माझ्याकडे...मला हाक मारतोय’ असे म्हणत आक्रोश केला. विजेचा शॉक लागल्यानंतर ग्रामस्थांनी हितेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले. असता त्याच्या हाताला घट्ट गुंडाळलेला नायलॉन मांजा तसाच होता.

तब्येत ठीक नसल्याने बहिणीने पतंग देण्यास नकार दिल्याने बारावर्षीय हट्टी भावाने घरातच झोक्याच्या दोरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली. तर कुसुंबा गावात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागून आठवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. संक्रांतीच्या दिवशी या दोघा किशोरवयीन मुलांच्या आयुष्याची दोरी कापली गेली.

पलंगावर उभा राहून गळफास
प्रारंभी झोका खेळत असताना यशला गळफास लागल्याबाबत कयास लावला जात होता. घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत झोका बांधलेला आहे. त्या खाली बेड आहे. यशची उंची चार फुटापर्यंत आहे. बेडवरील गादीत पाय खोलवर गेल्याचे चिन्ह होते. बेडवर उभे राहून त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

जेवण न करतात गेला खेळायला : हितेश हा सकाळीच जेवण न करताच तो मुलांसोबत पतंग उडवण्यासाठी बाहेर गेला होता. मुलाचा मृत्यू झाल्याची वडिलांना सोशल मीडियावरुन माहिती मिळाली. त्याचे अजोबा रघुनाथ पाटील यांना पक्षाघात झालेला आहे. ते अंथरूणाला खिळलेले आहेत. घराभोवती गर्दी झाल्याने त्यांनी नातेवाईकांना विचारणा केली. नातू कुठे गेला, अशी ते विचारणा करीत होते. शेवटी मुलाने नातवाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आक्रोश केला.

आईचा हृदय हेलावणारा आक्रोश : यशची आई परिसरात धुणीभांडी करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी गेलेली होती. घरात मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी त्यांना दिलेली नव्हती. रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगून त्यांना घरीच थांबवून ठेवले होते. ‘माझ्या मुलाला चांगल्या रुग्णालयात दाखल करा. त्याच्यावर चांगले उपचार करा’ अशा शब्दात यशच्या आईचा आक्रोश पाहून अंत:करण द्रवले. बहिण सोनी ही धाय मोकलून रडत होती. संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

बातम्या आणखी आहेत...