आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढला पाहिजेत. केंद्रात भाजपची व राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. कर्नाटकातही भाजपची सत्ता आहे. लवकरात लवकर यावर तोडगाव निघेल असे वाटते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राने साथ दिली पाहिजेत. नेत्यांनाही महाराष्ट्रातील लोकांनी साथ दिली पाहिजेत. कर्नाटकातील लोक एकत्र येवू शकतात तर महाराष्ट्रानेही पक्षभेद विसरुन महाराष्ट्र एकसंघ असल्याचे दाखवले पाहिजेत, अशी अपेक्षा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
कर्नाटक सीमा प्रश्न न मिटल्यास कर्नाटकला जाण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री पाटील उत्तर देत होते.
देशाचे पंतप्रधान गुजरातचे आहेत. त्यांचा तेथे प्रभाव आहेच. मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातचा विकास केलेला आहे. गुजरातमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपला बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने त्याचा बोध घेण्याची गरज आहे. नेहमी अॅन्टी इन्कबन्सी म्हणतो.
गुजरातमध्ये सलग 27 वर्ष भाजपची सत्ता
गुजरातमध्ये 27 वर्षे सत्ता अबाधीत ठेवून उलट बहुमताने निवडून येत आहेत. जनतेशी नाते ठेवले. विकासाची कल्पना पूर्ण केली तर जनता पाठीशी राहते. हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. मनजोडो होते ते कोणतीही जोडो होत नाही. ती यात्रा फक्त बघण्यासाठी लोक येतात, असेही मंत्री पाटील म्हणाले. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आप आदमी पार्टीला बहुमत मिळाल्याबद्दल त्यांनी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढली जाते. भाजप बहुमतपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.
एकनाथ खडसे हे ग्रेटच नेते
मी खूप पॉवरफूल आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांना, खासदारांना दूध संघाच्या निवडणुकीत मतदारांच्या दारावर फिरावे लागत असल्याचे आमदार एकनाथ खडसे म्हणतात. मागच्या वेळेसही ते पॉवरफूल होते. गिरीश महाजनांसह ते स्वत: मंत्री होते. मंत्री पॉवरफूलच असतो. ते आमचे नेते आहेत.त्यांना आम्ही नेताच मानतो. निवडणुकीपुरत्या गोष्टी सोडल्या तर एकनाथ खडसंेसारखा ग्रेट नेता नाही. त्यांना नेता अमान्य करतच नाही, असे मंत्री पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.