आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूचे फेसबूक Live:पत्नीच्या आत्महत्येने दुःखी झालेल्या पतीने ट्रेनमधून मारली उटी, मृत्यूपूर्वी केले फेसबूक लाइव्ह

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील जळगावमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या मृत्यूनंतर दुःखी होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी फेसबूक live वरुन आपल्या कुटुंबासाठी एक व्हिडिओ जारी केला. दीपावलीपूर्वी त्या व्यक्तीच्या पत्नीने विष घेऊन आत्महत्या केली होती. त्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. दरम्यान, माता-पिताच्या मृत्यूनंतर दोन चिमुकले अनाथ झाले आहेत.

घटना शहरातील कंचननगरची आहे. प्रमोद शेटे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी आत्महत्येपूर्वी प्रमोदने धावत्या ट्रेनच्या दारात उभे राहून फेसबूक लाईव्हवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. प्रमोद शेटेची पत्नी कंचन शेटे(26) ने मागच्या आठवड्यात विष घेऊन आत्महत्या केली होती. प्रमोद यांचा मृतदेह पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.