आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेसीई संस्थेच्या इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च महाविद्यालयातील 36 वर्षांपासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावर पुण्यात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी डॉ. आनंद दुबे यांनी भावी विद्यार्थ्यांच्या चांगल्या बिजनेस आयडीयासाठी दहा लाखापर्यंत मदत करण्याचे आश्वासन दिले.
यासह भावी विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या व इंटर्नशीप संधी, नोकरीविषयक मार्गदर्शन आणि इंडस्ट्री संपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. मधुलिका सोनवणे ह्यांनी त्यांच्या यशात आयएमआरच्या योगदानाची माहिती दिली.
महाराष्ट्र बीजेपी व्यापारी सेलच्या अध्यक्षा अमृता देवगावकर यांनी विविध क्षेत्रातील तसेच राजकारणातील संधींना शोधण्याचे व उद्योग स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या मदतीचे आश्वासन दिले. डॉ. तृप्ती अग्रवाल ह्या वीआयटी समूहाच्या एमडी डॉ. तृप्ती अग्रवाल व एअरटेलमध्ये कंट्री हेड पदावर काम करणाऱ्या सौरभ चौधरी यांनी स्टार्ट-अप सुरू करण्याचे मार्गदर्शन केले. मिथिलेश ओझा आणि परजसिंग राजपूत यांनी आयटी क्षेत्रातील संधींची माहिती उपलब्ध करून दिली.यासह उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आयटी क्षेत्रात होणाऱ्या चढउतार बाबत माहिती दिली. या मेळाव्यात जळगाव, मुंबई, पुणे, भोपाळ, दिल्ली आणि नागपूर येथून 1986 पासूनचे 185 माजी विद्यार्थी उपस्थित होतेे.
करिअर घडविताना जीवनाचा आनंद देखील घ्या, असा सल्ला माजी विद्यार्थ्यांना दिला. सध्या जगभरात स्टार्ट-अपला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागतिक संधीची माहिती भावी विद्यार्थ्यांना दिली. अध्यक्षीय भाषणात संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे ह्यांनी उच्च पदावर स्थित असलेल्या आणि स्वबळावर यशस्वी व्यापार उभारणाऱ्याचे कौतुक केले. भविष्याच्या विविध विद्यार्थीभिमुख योजनांसह आयएमआरच्या स्वायत्त होण्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.