आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संस्कृतीत मंगळसूत्र हे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे लग्नानंतर साधारणपणे प्रत्येक स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळते; पण अनेक महिलांना मंगळसूत्र घालायला आवडत नाही. कारण मंगळसूत्राच्या पारंपरिक डिझाइन्स त्यांच्या स्टायलिश लूकशी जुळत नाहीत. तर काहीजण स्टायलिश मंगळसूत्र घालतात. सध्या हटके लूकसाठी महिलांची मंगळसूत्र ब्रेसलेट प्रकाराला पसंती मिळत असून, मेट्रो सिटीनंतर आता जळगावात देखील हा ट्रेंड चांगलाच रुजायला सुरुवात झाली आहे. ऑफिस आणि पार्टी लूकसाठी याची सर्वाधिक खरेदी केली जात आहे.
लग्न झालेल्या महिलेच्या कपाळी कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवे हे सौभाग्याची निशाणी समजले जायचे; मात्र बदलत्या काळानुसार कुंकू आणि जोडवे काही प्रमाणात बाद झाले. तर मंगळसूत्राची जागा आता हातात झाली आहे. हातात घालण्याचं मंगळसूत्र म्हणजेच मंगळसूत्र ब्रेसलेट्स बाजारात येऊ लागली आहेत. हातावर घालण्यासाठी मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड सध्या अभिनेत्री, राजकीय पदाधिकारी महिला यांच्यासह पार्टी व ऑफिस लूकसाठी ट्राय करत आहे. यात काळ्या मण्यांपासून तर सोन्याच्या पट्टीपर्यंतचे मंगळसूत्राचे ब्रेसलेट बाजारात उपलब्ध आहे.
विविध प्रकार आहेत उपलब्ध : हातात घालायच्या या मंगळसूत्रात राशी चिन्हाचे पेडंटमध्येही बनवता येते. एवढेच नाही तर मंगळसूत्राच्या पेंडंटचा रंगही आपल्या आवडी आणि राशीनुसार ठेवता येतो. जर एखाद्या महिलेला साधं ब्रेसलेट हवे असेल तर काळ्या आणि गोल्डन मण्यांचे घालू शकता. यासोबतच पतीचे नाव स्टायलिश फॉन्टमध्ये बनवू शकता आणि त्याचे मंगळसूत्र बनवू शकता. जर पतीचे पूर्ण नाव खूप मोठे असेल तर तुम्ही त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षराने बनवलेले पेंडंट घेऊ शकता. जळगावात पेंडंट स्वरूपातील मंगळसूत्राला कमी मागणी आहे असे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
एक ग्रॅमला अधिक पसंती
मल्टी-चेन मंगळसूत्राव्यतिरिक्त ब्रेसलेट मंगळसूत्र बनवतात. यात एक मोठा हिरा आणि आजूबाजूला काळ्या मण्यांची लेस असलेले ब्रेसलेट तयार होतात. गोल्डन ब्लॅक हे कॉम्बिनेशन आवडत नसेल तर गोल्डन सिल्व्हर ट्राय करतात. रोज घालण्यसाठी हे ब्रेसलेट सोन्यात किंवा चांदीतही बनवले जात असून, एक ग्रॅमच्या दागिन्याला अधिक पसंती मिळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.