आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:धानोराजवळ मांजरोद-जळगाव‎ बस अपघात; 17 प्रवासी जखमी‎

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव आगाराची मांजरोद-जळगाव बस‎ रस्त्यावरून घसरून, १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले.‎ गुरुवारी सकाळी ८ वाजता धानोरा-देवगाव रस्त्यावर हा‎ अपघात झाला. जळगाव डेपोची मुक्कामी मांजरोद‎ -जळगाव एसटी बस (क्र.एम.एच.१९.बी.टी. २३६४)‎ धानोरा येथून गुरुवारी सकाळी आठ वाजता आपल्या‎ नियोजित मार्गावर निघाली होती.

गुरुवारी सकाळी धानोरा‎ परिसरता बेमोसमी पावसाने तुरळक हजेरी लावली होती.‎ त्यामुळे रस्ता ओला झालेला होता. या रस्त्यावरून जातानाा‎ चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून बस अचानक‎ घसरून सरळ रस्त्याच्या बाजूला उतरली. या अपघातात‎ बसमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा एकूण १७‎ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.‎

बातम्या आणखी आहेत...