आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासिका‎:मनोदय पीएसआय मिर्झा यांनी एका कार्यक्रमात कथन केली आपबिती‎; साडे बारा लाखातून उभारणार अभ्यासिका‎

भडगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव‎ येथील रहिवासी व शिरपूरला‎ पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत ‎ ‎ असलेल्या मुस्तफा मिर्झा यांनी एका‎ खासगी दूरचित्रवाणीवरील सामान्यज्ञानावर आधारित "कोण‎ होणार करोडपती’या कार्यक्रमात‎ साडे बारा लाख रुपये जिंकले.‎ त्यातून ते भडगावात अभ्यासिका‎ उभारणार आहेत .‎ मिर्झा म्हणाले, मी पी. एस. आय.‎ होण्यापूर्वी जळगावला‎ अभ्यासासाठी अभ्यासिकेत‎ जायचो. अभ्यास करताना माझा‎ मोबाइल नेहमी बंद असायचा. ज्या‎ दिवशी वडिलांचे निधन झाले,‎ त्यादिवशी नेहमीप्रमाणे मोबाईल बंद‎ असल्याने वडिलांना इच्छा असूनही‎ ते माझ्याशी बोलू शकले नाही. ही‎ सल कायम मनात आहे.

त्यामुळे‎ अभ्यासासाठी युवकांना भडगाव‎ सोडून बाहेरगावी जाण्याची वेळ‎ भविष्यात येऊ नये, यासाठी मी‎ जिंकलेल्या रकमेतून अभ्यासिका‎ उभारणार आहे. कार्यक्रमादरम्यान‎ त्यांनी सूत्रसंचालक सचिन खेडेकर‎ यांना विनंती केली की, कोविडच्या‎ काळात पोलिस दलाने जीव‎ धोक्यात घालून काम केले आहे.‎ तेव्हा आपण कार्यक्रमाच्या‎ माध्यमातून सर्व पोलिस दलाला एक‎ सॅल्यूट द्यावा, त्यांच्या विनंतीला मान‎ देऊन सॅल्यूट ठोकला.‎ ‎ मुस्तफा मिर्झा यांचे प्राथमिक शिक्षण‎ माध्यमिक शिक्षण अँग्लो उर्दू‎ हायस्कूल तर अकरावी-बारावीचे‎ शिक्षण मराठी माध्यमातून‎ लाडकूबाई ज्युनिअर कॉलेज व र.‎ ना. देशमुख महाविद्यालयातून झाले.‎ सचिन खेडेकर यांच्या हस्ते धनादेश स्विकारताना मुस्तफा मिर्झा.‎

बातम्या आणखी आहेत...