आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:मनपा माेबाइल टाॅवरला‎ जागा भाडेतत्त्वावर देणार‎‎

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या प्रशासकीय खर्चात‎ झालेली वाढ व उत्पन्नातील‎ तफावत वाढली आहेे. भविष्यात‎ सातव्या वेतन आयाेगाचा भार‎ वाढणार आहे. याशिवाय कर्मचारी‎ भरती झाल्यास पगाराचा खर्च‎ वाढेल. त्यामुळे आधीच‎ महापालिका प्रशासनाकडून उत्पन्न‎ वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.‎ त्यासाठी महापालिका मालकीच्या‎ इमारती, खुल्या जागांवर माेबाइल‎ टाॅवर उभारून भाडे आकारणी‎ करण्याचे नियाेजन मिळकत‎ व्यवस्थापन विभागाकडून सुरू‎ करण्यात आलेले आहे.‎ पुढच्या आठवड्यात हाेणाऱ्या‎ महासभेत या संदर्भात प्रस्ताव‎ चर्चेसाठी आणण्यात आला आहे.‎

त्यात महाराष्ट्र टेलिकाॅम‎ इन्फ्रास्ट्रक्चर मार्गदर्शक तत्त्वानुसार‎ महापालिका आपल्या मालकीच्या‎ जागा, खुल्या जागा, व्यापारी‎ संकुलांचे टेरेसवरील जागा भाडे‎ तत्त्वावर माेबाइल टाॅवर‎ उभारणीसाठी देऊ शकते असेही‎ प्रस्तावात म्हटले आहे. यापूर्वी जुने‎ बीजे मार्केटचे टेरेस माेबाइल‎ कंपनीला भाडेतत्त्वावर दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...