आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:मार्केट यार्ड असोसिएशन 50 व्या वर्षीही बिनविरोध

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव मार्केट यार्ड अडत असोसिएशनची कार्यकारिणी पन्नासाव्या वर्षीही बिनविरोध निवड झाली. या असोसिएशनची स्वमालकीची इमारत असून, तिचे ४७ सदस्य आहेत. अध्यक्षपदी विष्णुकांत मणियार तर सचिवपदी सुनील तापडिया यांना संधी देण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष दीपक महाजन, कार्याध्यक्ष संजय शाह, कोषाध्यक्ष राजेंद्र जाेशी, उपसचिव प्रमाेद वर यांचा समावेश आहे. मार्केट यार्डमधील व्यापारी बांधवांना बदलत्या शासकीय कायद्यांची तज्ज्ञांकडून माहिती उपलब्ध करून देणे, व्यवहार वृद्धीच्या दृष्टीने असोसिएशन कार्य करणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष मणियार यांनी दिली. मार्केट यार्डमधील व्यापारी, आडते, शेतकरी, कामगार यांच्यात समन्वय साधण्यासाठी असोसिएशन प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी संचालक शशिकांत बियाणी, अशोक राठी, प्रफुल्ल दहाड, मनोज पोपली, जगदीश वाणी व नवनिर्वाचित संचालक उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...