आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुदायिक विवाह कक्ष:मराठा सेवा संघातर्फे क्यूआर‎ कोडवर विवाहेच्छुकांची नोंदणी‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा संघाच्या वधू-वर सूचक व‎ सामुदायिक विवाह कक्षातर्फे २६ मार्च‎ रोजी धुळे येथे खान्देशस्तरीय वधू-वर‎ पालक परिचय मेळाव्याचे आयाेजन‎ करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी‎ प्रत्यक्ष नोंदणी सोबत ऑनलाइन नोंदणी‎ सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात‎ विवाहेच्छुकांना क्यूआर कोड स्कॅन‎ करून आपली नोंदणी करता येणार आहे.‎ मेळाव्यात पालकांना नोंदणी करताना‎ काही अडचणी आल्यास वधू-वर‎ कक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा‎ असे आवाहन मराठा सेवा संघाने केले‎ आहे.

खान्देशातील मराठा समाजातील‎ उपवर मुला-मुलींचे विवाह जुळून यावेत‎ याबाबात माहितीसाठी वधू-वर नोंदणी‎ पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे.‎ मेळाव्यासाठी १० मार्चपर्यंत नोंदणीस मुदत‎ आहे. त्यानुसार समाजातील‎ विवाहेच्छुकांनी आपली नावे नोंदवावीत‎ असे संतोषराव सूर्यवंशी, अनिल पाटील,‎ प्रा. सुनील गरुड, प्रा. जे व्ही. अहिरराव,‎ प्रा. इंदिरा पाटील व इतर पदाधिकारी‎ आदींनी कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...