आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळून आल्या रेशीमगाठी!:सिंधी समाज सामूहिक विवाह सोहळ्यात 7 जोडप्यांचे शुभमंगल; 36 वर्षांनंतर पहिल्यांदा सर्वांत कमी विवाहांची नोंद

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टसह‎ जात पंचायतींतर्फे सिंधी‎ समाजाचे आराध्य दैवत संत बाबा हरदासराम यांच्या 118 व्या ‎जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी‎ हरदासराम मंगल कार्यालयात भव्य ‎धार्मिक सोहळ्यासह 7 सामूहिक सिंधी समाज विवाह लावण्यात आले.

कोरोनाच्या दोन वर्षे खंडानंतर प्रथमच हे विवाह होत असले तरी गेल्या 36 वर्षातील सामूहिक विवाहांची ही सर्वांत नीचांकी संख्या आहे. कोरोनाकाळात अनेकांनी जसे जमेल तसे विवाह लावल्याने प्रथमच ही संख्या कमी झाल्याने यंदा केवळ 7 सामूहिक विवाह लावण्यात आले. या निमित्ताने‎ पाच हजारावर समाजबांधव या वेळी उपस्थित होते.

1985 पासून हरदासराम जन्मोत्सव सोहळ्यात सामूहिक विवाहाचे आयोजन केले‎ जाते. वर्सी महोत्सवानंतर संत बाबा हरदासराम जन्मोत्सव व सामूहिक विवाह सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्या 36 वर्षांत आतापर्यंत सामूहिक विवाहांत‎ 101, 71, 61, 51, 31 अशा जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. प्रथमच यंदा केवळ 7 विवाह लावण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. संत बाबा हरदासराम जन्मोत्सव व सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त राज्यासह‎ मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथून पाच हजारावर समाजबांधवांनी उपस्थिती दिली. सोहळ्यात वॉशिंग मशीन, मंगळसूत्र, शिलाई मशीन, मिक्सर आदी 35 संसारोपयोगी वस्तूंचा‎ आहेर वधू-वरांना देण्यात आला. सोहळ्यासाठी ट्रस्टचे दयानंद‎ कटारिया, अशोक मंधान, राम‎ कटारिया, राजू अडवाणी, रमेश मतानी, राजकुमार वालेचा, विजय दारा आदींनी सहकार्य केले.

सकाळी 5.30 वाजता संत हरदासराम यांच्या पुतळ्याला पंचामृत स्नानाने जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी ९ वाजता मुकूट बंधन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10.30 वाजेपासून सिंधी कॉलनी परिसरातून संत हरदासराम यांची पालखी, 7 वरांची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेची सांगता सेवा मंडळात करण्यात आली. दुपारी 12.30 वाजता अखंड पाठसाहेबची समाप्ती करण्यात आली. त्यानंतर दुपारी 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत धार्मिक मंत्र्योच्चारात वैदिक पद्धतीने विविध विविध विवाह विधी पार पडण्यात आले.

संत बाबा हरदासराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी कॉलनी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सिंधी समाजबांधवांसह विविध शाळांचा समावेश होता. या शोभायात्रेत संत बाबा हरदासराम यांच्या पालखीसह महिलांचे भजन, नृत्य तसेच बॅण्ड पथकात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे लेझिम आकर्षक ठरले. रात्री कंवरनगर परिसरातील बाल मंडळींनी संत बाबा हरदासराम यांच्या जीवनावर नाटिका सादर केली. तर जय बाबा महिला मंडळातर्फे बाबांचया जीवनावर भजने सादर केली.

बातम्या आणखी आहेत...