आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडळसरे:15 दिवसात केले दुसऱ्यांदा लग्न, नवरीच्या आईलाही झाली अटक

पाडळसरे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 5 जणांना अटक अन‌् तीन दिवसांची कोठडी

लग्नाच्या बहाण्याने पैसे घेऊन पसार होणाऱ्या ८ जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील ५ जणांना अटक करण्यात अाली अाहे. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. फरार झालेल्या नवरीच्या अाईला ही पाेलिसांनी शनिवारी अटक केली अाहे. शहादा तालुक्यातील मंदाणे येथून नवरदेव मुलाकडून १ लाख ३० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पलायन करून श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे १५व्या दिवशी पुन्हा पढावद (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी व हल्ली सुरतला राहणाऱ्या युवकाशी दुसरे लग्न करणारी नवरी मुलगी, तिची आई, मामा, मावशी, भाऊ व तीन दलाल अशा आठ जणांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात संगनमताने लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

यातील चार जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. मात्र यातून नवरीचा भाऊ, आई व तीन जण फरार झाले होते. त्यातील नवरीच्या आईला २२ रोजी शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार विश्वास साळुंखे, महिला पोलिस कल्पना पाटील यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातून अटक केली. या पाचही जणांना शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल
पीडित भूषण सैंदाणे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा १ लाख ५० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पळून जाणारी पत्नी सोनू राजू शिंदे, सासू वंदनाबाई राजू शिंदे, शालक भैरव राजू शिंदे (तिन्ही रा. हिंगोली) तर मामसासरे योगेश संजय साठे (रा. अकोला), दलाल पूजा प्रकाश साळवे, प्रिती राजेश कांबळे (दोन्ही रा. हिंगोली), बाबाराव आमले (रा. औरंगाबाद), रवींद्र गयभू गोपाळ (रा. कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला अाहे. या अटक केलेल्या सोनू, वंदनाबाई, योगेश, पूजा व दलाल या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची ३ दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अन्य फरार लवकरच ताब्यात येतील, असे पीएसअाय सुरेश साेनवणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...