आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार, उपचारादरम्यान मृत्यू; उपचारासाठी नेत असताना तरुणीने सांगितली आपबिती

पारोळा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणीने केला होता 3 पुरुष आरोपींसह मारहाण करणाऱ्या एका महिलेचा उल्लेख, गूढ कायम

तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या तरुणीचा धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.१०) मृत्यू झाला. याप्रकरणी पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार पारोळा पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक अत्याचार, बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, पोलिसांनी टोळी येथील तीनपैकी दोन संशयितांना ताब्यात घेतले. तत्पू्र्वी, शिवनंदन पवार नावाच्या मुख्य संशयिताने ९ नोव्हेंबरला विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहे.

टोळी येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात एसवायबीएस्सीचे शिक्षण घेते. वडिलांचे निधन झालेले असल्याने ती आई, दोन बहिणी व दोन भावांसोबत टोळी येथे राहत होती. ३ नोव्हेंबरला ती दिवाळीसाठी मामांकडे पारोळा येथे आली. दरम्यान, ७ नोव्हेंबरला औषधी घेण्यासाठी जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र, उशिरापर्यंत घरी न परतल्याने मामा व कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिच्या मामाने त्याचदिवशी सायंकाळी ५.३० वाजता पारोळा पोलिसांत मिसिंग दाखल केली. दुसऱ्या दिवशी ८ नोव्हेंबरला ही तरुणी पारोळा शहरातील लहान राम मंदिर परिसरातील लालबाग मैदानावर बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यामुळे मैदानावर खेळणाऱ्या मुलांनी तिला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. बेशुद्ध मुलगी आपली भाची असल्याचे समजताच मामाने टोळी येथील बहिणीला (मुलीच्या आईला) पारोळा येथे बोलावले. धुळे येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.१०) सकाळी तिचा मृत्यू झाला.

गुंगीचे औषध देऊन तिघांनी केला अत्याचार...

तरुणीला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना तिने आपबिती कथन केली. त्यानुसार टोळी येथील शिवनंदन शालिक पवार हा मैत्रीसाठी इशारा करत होता. मात्र, मी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवनंदन पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील यांनी ७ रोजी पारोळा येथून अपहरण करून कासोदा परिसरात अनोळखी ठिकाणी नेले. तेथे गुंगीचे औषध देऊन रात्री तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकाराला विरोध केल्यावर वरील तिघांनी व तेथे हजर असलेल्या एका महिलेने मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ करून तुला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे पीडितेने आई व मामाला सांगितले.

मारहाण करणाऱ्या महिलेचे गूढ...

पीडित तरुणीने मृत्यूपूर्वी आपले मामा व आईला दिलेल्या माहितीनुसार टोळी येथील ३ पुरुष आरोपींसह मारहाण करणाऱ्या एका महिलेचा उल्लेख केला होता. मात्र, ही महिला कोण? हे उशिरापर्यंत समोर आले नाही. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एकूण ४ पैकी २ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. इतर दोघांचा कसून शोध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...