आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड नामजप यज्ञ‎ यागाचे आयोजन:स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त‎ सामूहिक गुरुचरित्र पारायण‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैजूपर येथील‎ विद्यानगरातील श्री स्वामी‎ समर्थ मंदिरात १२ ते १८‎ एप्रिलदरम्यान श्री स्वामी‎ समर्थ पुण्यतिथीनिमित्त‎ सामूहिक गुरुचरित्र पारायण‎ व अखंड नामजप यज्ञ‎ यागाचे आयोजन करण्यात‎ आले आहे.‎ १२ एप्रिलला नाम जप‎ यज्ञ सप्ताहाची सुरुवात‎ होईल. प्रारंभ मंडळ‎ स्थापना, अग्नी स्थापना,‎ स्थापित देवता हवन होईल.‎ १३ला नित्य स्वागत,‎ श्रीगणेश व श्री मनोबोध‎ याग, १४ला नित्य स्वाहाकार‎ चंडीयाग होईल. १५ला‎ नित्यस्वाहाकार स्वामी याग,‎ १६ला श्री गीताई याग, १७ला‎ श्री नित्य स्वाहाकार, श्री‎ रुद्रयाग होईल. तर १८ला‎ एप्रिल नित्य स्वाकार‎ बलिपूर्णाहुती हाेणार आहे.‎