आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरू:माथेफिरूने सात वाहने पेटवली

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आदर्शनगरात शुक्रवारी पहाटे एका माथेफीरूने परिसरातील अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवली. एका वाहनाचे टायर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला होता. या घटनेत १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले. हा माथेफीरु एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. कापड पेटवून वाहने जाळताना ताे दिसला आहे.

आदर्शनगर, गणपतीनगरात अंदाजे २५ वर्षांचा एक माथेफीरु शुक्रवारी पहाटे ३.३६ वाजता एका अपार्टमेंटच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरला. एक कापड पेटवून पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना त्याने आग लावली. त्यानंतर तो पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येतो आहे. या अपार्टमेंटमधून बाहेर आल्यानंतर त्याने परिसरात एकेक करुन सात वाहने पेटवली.

जय गुरूदेव अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या पेटत्या दुचाकीचे टायर फुटले. ही दुचाकी (एमएच १९ बीवाय ४९७७) जगदीश मलनाथणी यांची आहे. टायर फुटताच स्फोट झाल्याने जगदीश यांची झोप मोडली. ते खाली आल्यानंतर परिसरात अनेक लोक बाहेर असल्याचे दिसून आले. पाहणी केली असता जगदीश यांच्या दुचाकीसह पवन हेमनानी यांची एमएच १९ डीजे ८०४७ ही दुचाकी, डॉ. मिलिंद जोशी यांची एमएच १९ एपी १३४५ क्रमांकाची कार, ओम पारपाणी यांची एमएच १९ सीयू ९४४४ क्रमांकाची कार, राजेश पंजाबी यांची एमएच १९ सीयू ७१०६ कार, एमएच १९ डीए ४८९६ व एमएच १९ सीए ३७५६ क्रमांकाच्या दुचाकी अशी सात वाहने या माथेफिरूने पेटवली. त्यात १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले. जगदीश मालनाथाणी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...