आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवालास विलंब:रुग्ण बरा झाल्यानंतरच मिळताे गोवरचा अहवाल

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वत्र गोवरची साथ वाढत असताना लक्षणे असलेल्या रुग्णांच्या तपासण्या करण्याबाबत आरोग्य विभागाकडून सूचना दिल्या जात आहे; मात्र प्रत्यक्षात सर्वच जिल्ह्यातून रक्ताचे नमुने अधिक जमा होण्यास सुरुवात झाल्याने आता अहवालास विलंब होत आहे.

परिणामी रुग्ण बरा झाल्यावर आरोग्य विभागातर्फे अहवाल प्राप्त होत आहे. अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयांकडून उपचार करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. नमुने पाठवल्यानंतर पूर्वी आठवड्यात अहवाल प्राप्त होत असे. आता राज्यातून नमुने अधिक जमा होत असल्याने अहवालासाठी महिना लागताे. सध्या शहरातील ४२ अहवाल प्रलंबित आहेत.

बातम्या आणखी आहेत...