आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहीम:पाच दिवसांत दिली 625 बालकांना गोवरची लस ; रुग्णची संख्या अजुनही 172 वर कायम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून, गेल्या पाच दिवसात ६२५ बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी गोवरचा एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून आतापर्यंतची रुग्ण संख्या १७२ वर कायम आहे. तर ५५ अहवाल प्रलंबित आहे. ज्या भागात गोवर साथीचा उद्रेक आहे. अशा भागात मंगळवारी ९ तर आतापर्यंत २८१ अतिरिक्त डोस देण्यात आले आहे. २५ डिसेंबरपर्यंत ही माेहीम आहे.

बातम्या आणखी आहेत...