आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघा भावंडांनी रजत व सुवर्ण पदक प्राप्त:योगा स्पर्धेत गौरी; सन्मुखला पदक

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स स्पर्धा हरिद्वार येथे झाल्या. या राष्ट्रीय स्पर्धेत कबड्डी, तायक्वांदाे, योगा, चेस, कॅरम, कराटे, कुस्ती या खेळांचा समावेश होता. स्पर्धेत तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते. योगा स्पर्धेत गौरी महाजन व सन्मुख महाजन या दोघा भावंडांनी रजत व सुवर्ण पदक प्राप्त केले.

योगा या क्रीडा प्रकारात देशभरातून तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सन्मुखने २२ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तर गौरीने पंधरा वर्षे मुलींच्या वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक प्राप्त केले. स्पर्धेत त्यांना गणेश महाजन, मनाली दवे यांनी मार्गदर्शन केले. या विजयामुळे गौरी व सन्मुखची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट आॅलिम्पियाड गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...