आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी‎:श्रवण विद्यालयात वैद्यकीय तपासणी‎

जळगाव‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण ‎विकास मंदिर, कर्णबधिर विद्यालय व अलियावर जंग राष्ट्रीय विकलांग‎ संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ९‎ ते ११ नोव्हेंबर दरम्यान दिव्यांग‎ कर्णबधिर बालकांकरिता श्रवणदोष तपासणी व मोफत श्रवण यंत्र वाटप‎ शिबिर घेण्यात आले.‎

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. हेलन‎ केलर व विद्येची देवता शारदा माता‎‎ यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथी‎ आलियावर जंग, तज्ज्ञ मार्गदर्शक‎ संजय खंडागडे, पांडुरंग सावंत,‎ गोपाल शर्मा, अरविंद सुरवाडे यांच्या‎ हस्ते करण्यात आले. शिबिरात सुमारे‎ ११७ कर्णबधिर लाभार्थी विद्यार्थ्यांची‎ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून वैद्यकीय‎ तपासणी करून, त्यांचा श्रवणदोष‎ तपासून योग्य क्षमतेचे, अत्याधुनिक‎ पद्धतीच्या कर्णयंत्राचे मोफत वाटप‎ करण्यात आले. याप्रसंगी कानाची‎ स्वच्छता व कर्णयंत्राची निगा‎ यासंदर्भात शिक्षक तसेच तज्ज्ञ‎ मंडळींनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...