आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:महापौर जयश्री महाजन यांनी घेतली बैठक; शासनाकडे पत्रव्यवहार करणार

जळगाव6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या पालकांच्या जागेवर सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून अनुकंपधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. महापाैरांनी घेतलेल्या बैठकीत शासनाकडे पाठपुराव्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्या निर्णयानंतर उपाेषणकर्त्यांना आश्वासन देण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.

महापालिकेतील ११५ अनुकंपधारक गेल्या नऊ वर्षांपासून सेवेत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. नऊ वर्षात कोणतीही प्रशासकीय प्रक्रीया पार न पाडणाऱ्या मनपा प्रशासनाने आता राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वारंवार हेलपाटष मारूनही मनपा प्रशासन दखल घेत नसल्याची स्थिती आहे. प्रशासकीय अडचणी पुढे करून प्रशासनातील अधिकारी अनुकपंधारकांना न्याय देण्यासंदर्भात उदासीन असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यातून गेल्या चार दिवसांपासून दहा अनुकपंधारकांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली होती. या आंदोलनाची सांगता गुरुवारी सायंकाळी महापौर जयश्री महाजन, अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, आस्थापना अधिक्षक लक्ष्मण सपकाळे यांच्या उपस्थितीत सरबत पाजून करण्यात आली.

आंदोलन शेवटचा पर्याय
महापालिकेत सेवेत असताना आईचे निधन झाले. आईच्या जागेवर सामावून घेण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. आठ वर्षांपासून नियुक्तीची प्रतीक्षा आहे; परंतु आजपर्यंत यश आलेले नाही. आंदोलन हा शेवटचा मार्ग असतो. काजल नितीन पवार, अनुकंपाधारक

पेन्शन नको नोकरीच हवी
पतीचे निधन होऊन आठ वर्षे लोटली आहेत. प्रशासनाने पेन्शन सुरू केले; परंतु आठ हजारांत परवडत नाही. कुटुंबात दोन मुली आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता आहे. मनपाने सेवेत सामावून घ्यावे. - संगीता सपकाळे, अनुकंपाधारक

दोन वेळा उपोषणाची वेळ
गेल्या सहा वर्षांपासून पालिकेत नोकरी मिळेल या आशेने फिरतोय; परंतु प्रशासकीय अडचणी पुढे करून नेहमीच फिरवाफिरव सुरू आहे. दोन वेळा उपोषणदेखील केले. आता सहनशीलता संपली आहे. - देवेंद्र सपकाळे, अनुकंपाधारक

नऊ वर्षांपासून हेलपाटे सुरू
आईच्या निधनानंतर अनुकंपा भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून पालिकेत हेलपाटे मारणे सुरू आहे. शिक्षण असूनही बेरोजगार आहे. प्रशासनाने न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. - गौरव पुराणिक, अनुकंपाधारक

प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन
महापौरांनी उपोषणार्थींना प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन दिले आहे. ९ मार्च रोजी महापौर, आयुक्त यांच्यात उपोषणासंदर्भात चर्चा झाली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार करून प्रतीक्षा सूचीतील ज्या कर्मचाऱ्यांवर आक्षेप आहेत व जे प्रतीक्षा सूचित ज्येष्ठ क्रमांकावर आहे. अशांच्या वारसांना पद रिक्त ठेवून प्रतीक्षा सूचीतील पुढील अर्हता धारण करणाऱ्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. लेखापरीक्षणात ज्या मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत त्यांच्या नावासमाेरील आक्षेपाबाबत निरसन करून ती यादी शासनास प्रकरणनिहाय पाठवण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...