आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन सभा:भीमशाहीर बोदडे यांच्या आठवणींना मिळेल उजाळा ; पुण्यात सोमवारी राज्यस्तरीय अभिवादन सभा

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगरचे भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांचे अलिकडेच निधन झाले. महाराष्ट्रभर त्यांचे शिष्य विखुरलेले आहेत. पुण्यातही त्यांनी भीमगीत गायनाचे अनेक सामने गाजवले आहेत. त्यांच्या गीतगायन, लेखनाचा प्रवास उलगडण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील प्रतापसिंगदादा बोदडे अभिवादन समितीतर्फे राज्यस्तरीय अभिवादन सभा व संवाद सत्र सोमवारी (दि.२०) आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी (पुणे) येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अर्थात दिवसभर या निमित्ताने प्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात विदर्भातील ज्येष्ठ गायक डी. आर. इंगळे, खान्देशातील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक व साहित्यिक डॉ. मिलींद बागूल, पश्चिम महाराष्ट्राचे युवावक्ते प्रा. डॉ. सत्यजीत कोसंबी हे संवाद साधणार आहेत. राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कवी, गायक, कलावंत, कार्यकर्ते, अनुयायी, भीमशाहीर या कार्यक्रमात सहभागी होतील. आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत भीमशाहीर प्रतापसिंग बोदडे यांनी चळवळीशी जुळलेली नाळ तुटू दिली नाही. हजारो गिते लिहून त्यांना स्वत: चाली लावल्या. बोलीभाषांचे संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी मेहनत घेतली. त्यांच्या कार्याची नव्या पिढीला माहिती व्हावी, प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...