आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची तीव्रता वाढली:पारा 17  अंशांवर, रात्री गारठा; दिवसा उकाडा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दाेन दिवसांत चार अंश सेल्सिअसने कमी झालेल्या किमान तापमानामुळे जिल्ह्यात गारठा वाढला आहे. ढगाळ वातावरण निवळल्याने आणि वाऱ्याचा वेगही ताशी ८ किमीवरून ११ किमीपर्यंत वाढल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. किमान तापमान १७ तर कमाल तापमान ३३.२ अंशांच्या उच्चांकावर असल्याने दिवसा उकाडा आणि रात्री गारठा अशी स्थिती झाली आहे.

गेल्या ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर या आठवड्यात जिल्ह्यात प्रथमच किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पाेहाेचले हाेते. त्याचा परिणाम म्हणून थंडी गायब हाेऊन डिसेंबरमध्ये उकाडा जाणवत हाेता. या आठवड्यातील ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निवळली असून, रविवारी वातावरण केवळ ५ टक्केच ढगाळ हाेते. सोमवारपासून वातावरण निरभ्र राहणार असून त्यामुळे किमान तापमान १२ ते १३ अंशांपर्यंत कमी हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...