आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव:कर्तबगार महिलांचा केला सन्मान‎

जळगाव‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी वाल्मीकलव्य महासंघ‎ संचलित आदिवासी वाल्मीकलव्य‎ सेनेतर्फे शिवकाॅॅलनी परिसरात‎ कर्तबगार महिलांचा गाैरव करण्यात‎ आला. महाराष्ट्र जनक्रांती माेर्चाचे‎ प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी‎ मार्गदर्शन केले.‎

डॉ. सुरेश राणे अध्यक्षस्थानी‎ होते. प्रमुख पाहुणे म्हणून‎ एसएनडीटी महाविद्यालयाच्या‎ प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे,‎ सत्यशोधकी साहित्य परिषदेचे‎ जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल,‎ माजी जिल्हाधिकारी भागवत‎ सैंदाणे, जिल्हा स्काउट-गाइड‎ संघटक बी. व्ही. पवार, निवृत्त‎ उपविभागीय पोलिस अधिकारी सी.‎ पी. निकम, राजेंद्र रायसिंग, प्रभाग‎ समितीचे प्रमुख रवींद्र नेरपगारे,‎ सुरेश कोहली, महिला तक्रार‎ निवारण समितीच्या अध्यक्षा ज्योती‎ सोनार, आदिवासी वाल्मीकलव्य‎ सेना महिला समिती राज्य उपाध्यक्षा‎ सुलोचना बाविस्कर, आदिवासी‎ वाल्मीकलव्य सेनेचे प्रदेश सचिव‎ गुलाबराव बाविस्कर, जिल्हाध्यक्ष‎ योगेश बाविस्कर यांची उपस्थिती‎ होती. संगीता माळी, रत्नमाला‎ महाले, इंदिरा जाधव, जयश्री‎ नेमाडे, लताबाई बाविस्कर, सविता‎ सुतार, कांताबाई झेगोकार, मीराबाई‎ चौधरी, सुनंदा सोनगिरे, प्रतिभा‎ पाटील, संगीता कोळी, साळुंकाबाई‎ शिंपी यांचा साडी-चोळी, गुलाबपुष्प‎ देत सुलोचना बाविस्कर, पी. डी.‎ बाविस्कर यांच्या हस्ते सन्मान‎ करण्यात आला. प्रास्ताविक मंगल‎ बी. पाटील यांनी केले. खंडू महाराज‎ यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी‎ समाजबांधव उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...