आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायाभूत सोसीयुविधा:सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र जिल्ह्यात 50 हजार हेक्टरपुढे जाण्याची शक्यता, अनुदानासाठी 589 कोटींची तरतूद

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुदानात 80% वाढ, सूक्ष्म सिंचन क्षेत्र 20 हजार हेक्टरने वाढणार

शासनाने पूर्वी ४५ ते ५५ टक्क्यांपर्यंत असलेले ठिंबक आणि तुषार सिंचनाचे अनुदान सरसकट ८० टक्क्यापर्यंत वाढवले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. सुक्ष्म सिंचनाचा वापर ३० हजार हेक्टरवरून ५० हजार हेक्टर पुढे जाण्याचा अंदाज आहे. शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर अन्य शेतकऱ्यांना ४५ टक्के सुक्ष्म सिंचन अनुदान थेट ८० टक्क्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या हंगामात जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. यासाठी शेतकरी सध्या बाजारपेठेत दर्जेदार सूक्ष्मसिंचन साहित्याची खरेदी करीत आहेत. दोन वर्षापर्यंत राज्यात सूक्ष्म सिंचनासाठी ३६७ कोटी रूपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. दरम्यान, यावर्षी शासनाने राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी सरसकट ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे. यावर्षी शासनाने सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी ५८९ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्यात एकूण सिंचनाचे क्षेत्र वाढत असताना त्यातही सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अनुदानात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचा योजनेला वाढता प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सूक्ष्म सिंचन वाढणार
जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचनाचा सरासरी ३० हजार हेक्टरवर वापर केला जातो. दरवर्षी यात ७ ते १० हजार हेक्टर वाढ होत आहे. केळी, मोसंबी, लिंबू, पपई सारख्या पीकांसह कापसासाठीही सूक्ष्म सिंचनाला पसंती दिली जात आहे. तरी जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचा वापर ५० हजार हेक्टरपुढे गेलेला नाही. अनुदान वाढ केल्यामुळे यावर्षी सूक्ष्म सिंचन क्षेत्र ५० हजार हेक्टरपुढे जावू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठिबकचे सर्वाधिक कारखाने जिल्ह्यात
ठिबक उत्पादन कंपन्यांचे हब असलेल्या जळगाव जिल्ह्यात ठिबक उत्पादन करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या आहेत. जिल्हाभरात १०० पेक्षा अधिक कारखाने ठिबकचे उत्पादन करतात. यातील बहुतांश कंपन्याचे उत्पादन हे परराज्यात विक्रीसाठी जाते. जिल्ह्यात सर्वाधिक ठिबक उत्पादीत होत असले तरी वापर वाढलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...