आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंड वाऱ्यांचा परिणाम:किमान तापमान 10 अंशांवर; तीन दिवसांत चार अंश घसरले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात किमान तापमान तीन दिवसांत चार अंशांनी घसरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. साेमवारी किमान तापमान १० अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसच्या पातळीवर हाेते. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढली असून, त्यामुळे दिवसाही गारठा जाणवत आहे.जिल्ह्यात गेल्या महिन्यात १० डिसेंबर राेजी ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नाेंद झाली हाेती.

त्यानंतरच्या आठवड्यात मात्र किमान तापमान २१ अंशांच्या उच्चांकावर गेल्याने थंडी गायब हाेऊन दिवसासाेबत रात्रीचा गारठाही वाढला हाेता. डिसेंबर अखेरपर्यंत कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा कायम हाेती. दरम्यान, जानेवारीच्या सुरुवातीलाच थंडी वाढली आहे. १ जानेवारीला ११ अंशांवर असलेले किमान तापमान २ जानेवारीला १० अंशांच्या नीचांकी पातळीवर गेलेे. रात्री व दिवसाच्या तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे.

वाहतुकीलाही येताहेत अडचणी
थंडीसाेबतच धुकेही वाढल्याने महामार्गावर धुक्यामुळे वाहतूक प्रभावित हाेत आहे. उत्तरेतून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक देखील धुक्यामुळे प्रभावित झाले असून, अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत, तर काही गाड्या रद्द केल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...