आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात थंडीची तीव्रता कायम:किमान तापमान 5 अंशांनी घसरले; पारा 8.5 अंशांवर

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांत किमान तापमानात चढ-उतार हाेत आहे. रविवारी किमान तापमान १० अंशांखाली घसरून ८.५ अंशांवर गेले हाेते. त्यामुळे थंडीची तीव्रता अधिक वाढली. एकाच दिवसात तापमानात ५ अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. किमान तापमानासाेबत कमाल तापमानदेखील घसरले असून, रविवारी दिवसा तापमान २९ अंशांपर्यंत खाली आले हाेते. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी हाेती.

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत थंडीत वाढ झाली आहे. शुक्रवारी १०.३ अंश सेल्सिअस, शनिवारी १३ अंश सेल्सिअस तर रविवारी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात आली. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली असून, तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअस खाली गेला.

रात्रीच्या वेळी उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे थंडीची झुळूक हुडहुडी वाढवणारी ठरत आहे. किमान आणि कमाल तापमानात घट हाेत असताना वाऱ्याचा वेगही वाढ आहे. त्यामुळे जिल्ह्यात थंडीत वाढ हाेत आहे. या आठवड्यात थंडीची तीव्रता कायम राहणार आहे. तसेच किमान तापमानात आणखी काही अंशाने घट हाेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

बातम्या आणखी आहेत...