आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात वाढ:किमान तापमान वाढले, थंडी गायब‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात‎ किमान तापमानात वाढ झाली आहे.‎ १० अंश सेल्सिअसवर असलेले‎ किमान तापमान २ मार्च राेजी १६‎ अंश सेल्सिअसवर गेल्याने रात्रीचा‎ गारठा हरवला आहे. दिवसा कमाल‎ तापमानाचा पारा ३५.५ अंशावर‎ असताना किमान तापमान वाढल्याने‎ थंडीची तीव्रता कमी झाली आहे.‎ फेब्रुवारी महिन्यात किमान‎ तापमान निच्चांकी आणि कमाल‎ तापमान उच्चांकी पातळीवर हाेते.‎ मार्च महिन्यात कमाल आणि‎ किमान तापमानात वाढ झाली आहे.‎ किमान तापमानात सहा अंश‎ सेल्सिअसने वाढ झाल्याने रात्रीच्या‎ वेळी २ मार्च राेजी पहाटे हवेतील‎ गारवा कमी झालेला हाेता.

या‎ आठवड्यात किमान तापमान १७‎ अंशापुढे राहण्याची शक्यता आहे.‎ २८ फेब्रुवारीपासून राज्यात‎ वातावरण ढगाळ आहे. हवामान‎ विभागाच्या अंदाजानुसार ४ आणि‎ ५ मार्च राेजी ढगांची तीव्रता अधिक‎ वाढेल. खान्देशात तुरळक ठिकाणी‎ अवकाळी पाऊस हाेवू शकताे.‎ ढगाळ वातावरणामुळे उन्हाची‎ तीव्रता कमी झालेली असेल.‎ तापमान काहीसे कमी झाले तरी‎ उकाडा मात्र काही प्रमाणात‎ जाणवण्याची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...