आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:मंत्री गिरीश महाजन सुरेश जैन यांना भेटले

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी माजी आमदार सुरेश जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ‘सुरेश जैन हे भाजपत प्रवेश करणार आहेत का?’ असा प्रश्न माध्यमांनी मंत्री महाजन यांना विचारला. त्यावर या संदर्भात काेणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्याशी काैटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यांनी राजकारण साेडलेले नाही.

राजकारणात सक्रिय हाेण्याचा निर्णय ते घेतील. ते तर आमचे ज्येष्ठ नेते आहेत, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. संजय राऊतांबद्दल न बाेललेले बरे. केंद्र सरकार दिल्लीत आहे. पंतप्रधान, मंत्री तेथे असतात. त्यांना वाटत असेल आमचा मेंदू तेथे गहाण आहे तर हे हास्यास्पद वक्तव्य आहे. त्यांचाच मेंदू तपासण्याची वेळ आली आहे. त्यांची तिच परिस्थिती झालेली आहे. तोल सुटल्यासारखे बेताल विधाने ते करीत असल्याची टीकाही मंत्री महाजन यांनी केली. या वेळी भाजपचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण हे उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...