आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:चोपड्याला येऊन पालकमत्र्यांनी बांधून घेतली बहिणीकडून राखी, गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंचा घेतला खरपूस समाचार

प्रवीण पाटील | चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाऊ आणि बहिणीचा पवित्र उत्सव म्हणजे रक्षाबंधन असून गेल्या ४० वर्षांपासून खंड न पडू देता आवर्जून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधून घेतली आहे.

पालकमंत्री पाटील यांच्या दोन्ही बहिणी चोपड्यात असून एक गणेश कॉलनी तर एक सुंदरगढी राहतात. गुलाबराव पाटील हे रक्षाबंधना आवर्जून उपस्थित राहतात आणि बहिणींच्या हाताने राखी बांधून घेतात. सूंदर गढी येथील निर्जलाबाई देशमुख व गणेश कॉलनी भागात सुशीलाबाई गुर्जर या दोन्ही बहिणींची त्यांनी भेट घेतली. यावेळी धरणगाव येथील सेनेचे उपजिल्हा प्रमुख मोतीलाल पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख, नगरसेवक महेश पवार, राजाराम पाटील,विजय देशमुख, भरत देशमुख,नाना देशमुख,रोहित देशमुख,आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी दशेपासून मी या ठिकाणी येत असतो. बहीण आणि भावाचे हे दृढ नाते जेव्हा आई नसते तेव्हा बहीणींचा सर्वात जास्त आधार मिळतो आणि तो मला देखील मिळाला आहे. आज जे मला यश आणि फलश्रुती मिळाली आहे त्यात जसे जनतेचे आशीर्वाद मिळाले आहेत तशाच प्रकारे मला बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे.

ज्या प्रमाणे हवामानाचा अंदाज चुकीचा असतो त्याच प्रमाणे नारायण राणेंचा पोकळ अंदाज -
नारायण राणे हे किती दिवस अस्वस्थ होते हे साऱ्यांनी पाहिले आहे. राणे हे यापूर्वी भाजप-सेनेमध्ये अस्वस्थ होते, काही दिवस काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते, ज्या प्रमाणे हवामानाचा अंदाज चुकीचा असतो त्याच नारायण राणे याचा पोकळ अंदाज असून त्यांना केंद्रात सुक्ष्म लघु खाते मिळाले असून त्यामुळे त्याचे डोके देखील सूक्ष्म झाले आहे.

ज्या बाळासाहेबांनी त्यांना एवढं मोठं पद दिलं त्या लोकांनी बाळासाहेबांशी गद्दारी करून त्या ठिकाणी समाधीवर जाणे म्हणजे नौटंकी आहे. कार्यकर्त्यांनी जे गोमूत्र शिंपडले ते योग्यच होते. बाळासाहेब ठाकरे यांना शेवटच्या क्षणी त्रास दिला अशा गद्दाराचे हात आमच्या समाधीला लागता कामा नये, असे बोलून जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे याचा खरपूस समाचार यावेळी घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...