आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंपेक्षा शिंदेंचा दसरा मेळावा सरस असेल:मंत्री रामदास आठवलेंची भविष्यवाणी म्हणाले- राहुल गांधी पावसात भिजले ही पवारांचीच कॉपी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असल्याचे समाधान आहे. त्यांना विरोध नाही. सत्ता असूनही मुख्यमंत्री शिंदेना हे मैदान मिळाले नाही. तरीही शिंदे यांचा बीकेसी मैदानावर होणारा दसरा मेळावा सरस असेल. ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य शिंदेमध्ये आहे. शिंदेच्या मेळाव्यातील भाषण ऐकणार आहे. ठाकरेंचेही भाषण ऐकावे लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

भुसावळ येथे साजऱ्या होणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 66 वर्धापन दिनानिमित्त आठवले जळगावात आले होते. अजिंठा विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिंदे यांच्याकडे दोन तृतांश बहुमत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनाच द्यावे, अशी रिपाइंची मागणी आहे.

काही आमदारांना मंत्रीपद न मिळाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असे आमदार एकनाथ खडसे यांनी विधान केले होते. त्या अनुषंगाने पत्रकारांनी त्यांना विचारले. हे सरकार कोसळणार नाही.कार्यकाळ पूर्ण करेल. सन 2024 मध्येही महायुतीचे राज्यात सरकार येईल.

राज्यात मंत्रीपद हवे

रिपाइंला जिल्हा व राज्य पातळीवर सत्तेचा वाटा मिळेल,अशी मागणी करण्यात आलेली आहे. रिपाइंला मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संधी मिळाली नाही. दुसऱ्या विस्तारात मंत्रीपद देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते आश्वासन पाळतील,असे आठवले यांनी सांगितले. अजीत पवार यांनी आम्ही कधी सत्तेत येवू हे कळणारही नाही, या विधानाच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय आहे. कदाचित ते इकडे येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.

पानटपरीवाला चुना लावेल

शिवसेनेने व्यक्तीगत टीका करु नये.त्यामुळे त्यांचे अजून नुकसान होईल. पानटपरीवाला म्हणून गुलाबराव पाटील यांना हिणवले. पानटपरीवाला कधी कुणाला चुना लावेल,हे सांगता येत नाही. शिवसेनेत पडलेली एवढी मोठी फूट ही ठाकरेंना मोठी चपराक आहे. खडसे हे माझे चांगले मित्र आहेत. ते कोणत्या पक्षात जातात, हा पक्षांतर्गत विषय असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून भारत ताेडो यात्रा आहे. काॅंग्रेसचे बळ कमी झालेले आहे. केरळमधील पदयात्रेत पावसात भिजण्याच्या प्रसंगावर राहुल गांधी हे शरद पवार यांची कॉपी करत असल्याची टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...