आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई शून्य:अल्पवयीन मुले वाहनावर सुसाट; वाहतूक शाखेतर्फे कारवाई शून्य

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात शेवटच्या रविवारी अल्पवयीन मुलाच्या कार रेसमुळे बालकाचा मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतरही शहरात माेठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवतात. शाळांमध्येही ते बिनधास्त दुचाकी घेऊन जातात. असे असतानादेखील १५ दिवसांत वाहतूक शाखेकडून एकाही अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आलेली नाही.

मेहरूण तलावावर २८ ऑगस्टला दाेन कारमध्ये रेस लागली. कारने ट्रॅकवर सायकल चालवायला गेलेल्या विक्रांत मिश्रा या चाैथीत शिक्षण घेत असलेल्या बालकांला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पाेलिसांनी अल्पवयीन कारचालक मुलाच्या पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातात कुणाचे प्राण गेल्यास?
अल्पवयीनाने वाहन चालवून ताे कुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यास संबंधितावर भादंवि कलम ३०४(१), ३०४ (२) व कलम ३०४-अ या नुसार गुन्हा दाखल हाेताे. ३०४ (१) नुसार हेतुपुरस्सर कृत्य करणे. यात आजन्म कारावास. ३०४ (२) जाणीवपूर्वक कृत्य केले असेल तर दहा वर्षांपर्यंत कारावास किंवा केवळ दंड. कलम ३०४-अ. निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे. जाे काेणी हयगयीने अगर निष्काळजीपणाने बेदरकारपणाने कृत्य करून मृत्यू घडवताे; पण जाे सदाेष मनुष्यवध हाेत नाही. त्यास कारावासाची दहा वर्षांची शिक्षा असू शकेल. दंड किंवा दाेन्ही शिक्षा केल्या जातात.

बातम्या आणखी आहेत...