आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईमनगरी:चारित्र्याचा संशायतून मारहाण केल्याने पत्नीचा गर्भपात; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी गर्भवती असल्याचे माहित असूनही तिच्या पोटावर मारहाण केल्यामुळे गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध शनिवारी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार आफरीनखान जाकीर खान (वय 31, रा. गुरुदत्त कॉलनी, पाचोरा) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारीत्र्यावर संशय घेत पती जाकीर खान रसूल खानने 24 मे 2020 च्या रात्री लाथाबुक्क्यानी, लाथांनी व उजव्या पायाचा गुडघ्याने बेदम मारहान केली. त्यात विवाहितेला रक्तश्राव सुरू झाला. यानंतर उपचारादरम्यान विवाहितेचा गर्भपात झाला. एवढेच नव्हे तर जाकीर खानने आपल्या दोघं मुलांना देखील मारहान केली. या प्रकरणी पती जाकीर खान रसूल खान, जेठ अल्ताफ खान रसूल खान, जेठानी शबनम खान अल्ताफ खान (सर्व रा.पाचोरा) यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिस उपनिरीक्षक विजया वसावे तपास करत आहेत.

तर दुसरी एक घटना धरणगाव तालुक्यात घडली. येथे घर बांधण्यासाठी माहेरुन 5 लाख रुपया आणण्याची मागणी करत वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करुन विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधुरी तुषार महाजन (रा. धरणगाव) या विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आडगाव येथे घर बांधण्यासाठी माहेरहुन 5 लाख रुपये माहेरुन आणण्याची मागणी करुन पतीसह सासरचे लोक सतत शिवीगाळ व मारहाण करुन तीचा मानसिक व शारिरीक छळ करीत होते.

मुलगी कावेरी (वय 4 वर्षे) हीच्यासह माधुरी महाजन यांना मोहेरी टाकुन घातले. या प्रकरणी माधुरी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती तुषार विश्राम महाजन (रा. कल्याण, मुंबई), सासरे विश्राम सुखदेव महाजन, सासू सरला विश्राम महाजन, संदीप विश्राम महाजन (दीर), दिराणी योगिता संदीप महाजन (सर्व. आडगाव ता. एरंडोल ) यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद पाटील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...