आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी‎ अधिवेशन:आमदार भाेळेंनी पुन्हा‎ मांडले उद्याेजकांचे प्रश्न‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहराचे आमदार सुरेश‎ भाेळे यांनी शुक्रवारी विधानसभेत‎ जळगाव एमआयडीसीतील‎ उद्याेजकांचे प्रश्न मांडले. परंतु‎ यापूर्वीच्या अधिवेशनाप्रमाणे त्यांना‎ पुन्हा तीच आश्वासने देण्यात आली.‎ जळगावात नवीन एमआयडीसी‎ उभारण्यासाठी तसेच येथील‎ उद्याेगांच्या समस्या साेडवण्यासाठी‎ आमदार सुरेश भाेळे यांनी‎ विधिमंडळाच्या हिवाळी‎ अधिवेशनात तसेच सध्या सुरू‎ असलेल्या अर्थसंकल्पीय‎ अधिवेशनात देखील उद्याेगांचे प्रश्न‎ मांडले. गेल्याच महिन्यात उद्याेगमंत्री‎ उदय सामंत जिल्ह्यात आले हाेते.

या‎ वेळी त्यांनी उद्याेजकांच्या समस्या‎ साेडवण्यासाठी मुंबईत बैठक‎ बाेलवण्याचे आश्वासन दिले हाेते.‎ याची आमदार भाेळे यांनी‎ सभागृहात आठवण करून दिली.‎ उद्याेगमंत्र्याकडून जिल्ह्यातील‎ उद्याेगांबाबत ठाेस आश्वासन मिळू‎ शकले नाही. त्यामुळे उद्योजकांची‎ काही अंशी निराशी झाल्याचे बोलले‎ जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...