आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थगिती:आमदार चंद्रकांत पाटीलांनी दिली विकासकामांना स्थगिती : खडसे ; हा एक प्रकारचा जातिवाद आहे

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करत, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. विविध समाजांच्या विकासकामांना स्थगिती दिल्याने, हा एक प्रकारचा जातिवाद आहे. या जातीवादी धोरणाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, आमदार पाटील यांनी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मी २१७ कोटी रुपयांची कामे मतदारसंघात मंजूर करून आणली आहेत. त्यातील मूलभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये, मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी पाच कोटी, अल्पसंख्यांक शादीखाना हॉलसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये, दलित वस्ती सुधारणेसाठी दोन कोटी २० लाख रुपये, मुक्ताईनगर ते पिंपरी अकराऊत या रस्त्यासाठी दोन कोटी ६७ लाख, कुंड धरणासाठी दीड कोटी, बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी १०० कोटी, कुऱ्हा ,वडोदा उपसा सिंचन योजनेसाठी ५० लाख, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी २५ लाख, मुक्ताई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच कोटी, मुक्ताईनगर वाॅटर पार्कसाठी पाच कोटी, अशी एकूण २१७ कोटी रुपयांची कामे आपण मंजूर करुन आणली होती. यामध्ये तेली व लेवा पाटील समाजासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये, बंजारा समाजासाठी मोरझिरा येथे १५ लाख रुपये, एवढेच नव्हे तर मागासवर्गीयांसाठी संविधान सभागृह, शादीखाना हॉल अशा विविध समाजांचा या विकास निधी मध्ये समावेश असताना, आमदारांनी कामांना स्थगिती दिल्याचे खडसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...