आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन 2014 पासून राज्यघटनेची मोडकळीस आणण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे. सत्तापालट करुन काँग्रेसची सरकारे पाडण्याचे षडयंत्र होत आहेत.भाजपकडून बलिदानाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहेत. ईडीच्या कारवाया सुरू आहेतलेखक, साहित्यिक, कलावंत, बोलणाऱ्या व्यक्तींवर दडपशाही करण्यात येत असल्याचा आरोप आमदार सुधीर तांबे यांनी केला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील मुफ्ती हारून नदवी, महानगराध्यक्ष श्याम तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी आमदार तांबे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसची भूमिका मांडली.त्यानंतर पदयात्रेबाबत माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान काँग्रेसतर्फे जिल्ह्यात 75 कि.मी. पदयात्रा काढण्यात येणार आहे.त्याचबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दररोज 10 ते 12 कि.मी.पदयात्रा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.देशातील वाढत्या महागाईचा मुद्दा या पदयात्रेत राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या महिनाभरापासून मंत्रिमंडळ नाही. शेतकऱ्यांना मदत होत नाही. त्यामुळे मंत्रालयाचे नाव बदलून पूर्वीप्रमाणे सचिवालय करा,अशी भावना जिल्हाध्यक्ष पवार यांनी व्यक्त केली. वाढत्या महागाईच्या अनुषंगाने दिले निवेदन.....
देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. गेल्या महिनाभरापासून राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांना मदत करणे दुरापास्त झाले आहे. गॅस सिलिंडरमध्ये झालेली दरवाढ कमी होणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावी, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे आदी मागण्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.