आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेप:आमदार खडसे यांना दूध संघातील नाेकर भरती अंगलट येण्याची भीती

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध संघात अपहार नव्हे तर चाेरी झाली म्हणून पाेलिस ठाण्यात मुक्काम ठाेकणाऱ्या आमदार एकनाथ खडसेंनी आता एवढ्या दिवसांनी अचानकपणे हा अपहार प्रशासकाच्या काळातील असल्याचा आराेप केला आहे. पराभव झाला तर दूध संघातील नाेकर भरतीतील अपहार अंगलट येण्याची भीती असल्याने ते मतदारांमध्ये सभ्रम निर्माण करीत असल्याचा आराेप आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रपरिषदेत केला.

आमदार खडसेंनी बुधवारी दूध संघातील बी ग्रेड तुपाचे प्रकरण आमदार मंगेश चव्हाण प्रशासक हाेते त्या काळातील असल्याचा आराेप केला हाेता. या आराेपावर आमदार चव्हाण यांनी गुरुवारी भूमिका मांडली. एेन मतदानाच्या ताेंडावर असे आराेप करण्याची खडसेंची राजकीय रणनीती असते. त्यांनी आतापर्यंत सुरेश जैन, डाॅ. सतीश पाटील, गुलाबराव देवकरांसह ७० लाेकांचे राजकीय नेतृत्व संपवले असेही ते म्हणाले.

वितरकाकडून संचालक बढेंनी घेतले दाेन लाख’
जळगाव |
आैरंगाबाद येथे असलेली जिल्हा दूध संघाची दूध विक्रीची बंद केलेली एजन्सी पुन्हा सुरू करण्यासाठी दूध संघाचे संचालक जगदीश बढे यांनी दाेन लाख रुपये घेतल्याचा आराेप आैरंगाबाद येथील दूध वितरक गाेपीचंद पाटील यांनी केला आहे. याबाबत थेट बढेंच्या वैयक्तिक बँक खात्यावर धनादेशाद्वारे पैसे जमा केल्याचे बँक स्टेटमेंटचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले आहे. आैरंगाबाद येथे गाेपीचंद पाटील यांची दूध विक्रीची एजन्सी आहे. ही एजन्सी बंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...