आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफी मागावी:आमदार प्रशांत बंब यांचा शिक्षकांनी केला निषेध ; तहसीलदार महेश पवार यांना दिले निवेदन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. हा प्रकार शिक्षकांचा अवमान आहे असा आरोप करत त्यांनी राज्यातील शिक्षकांची माफी मागावी या मागणीसाठी साेमवारी जिल्ह्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध केला. यावल तालुक्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी तहसीलदार महेश पवार यांना निवेदन दिले. त्यात आमदारांना राज्यातील प्रश्न, समस्यांचे निराकरण व समस्या मांडण्याचे अधिकार आहेत. मात्र, भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सरसकट सर्व शिक्षकांचा घर भाडे भत्ता बंद करण्याबाबत आणि कार्यक्षमतेबाबत अपशब्द वापरले. दोषी शिक्षकांची तक्रार करण्याऐवजी त्यांनी सर्व शिक्षकांचा अवमान केल्याचा संघटनांचा आरोप आहे. यावलमधील शिक्षक संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला. आमदार बंब यांनी शिक्षकांची माफी मागावी, अशी मागणी केली. निवेदनावर प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्ष श्रीकांत मोटे, योगेश इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...