आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंडाच्या रकमेत वाढ:वाहतूक नियम मोडणारे आमदार, खासदार दंडाची रक्कम भरण्यातही मागे; आमदार महाजनांच्या दंडाच्या रकमेत वाढ

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आमदार, खासदार वापरत असलेल्या वाहनांवर वाहतुकीचे नियम मोडल्याने दंड लावण्यात आला आहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने १८ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानंतरही अपवाद वगळता इतर सर्वांनी दंड भरले नाहीत. शिवाय आमदार गिरीश महाजन आणि चंदुलाल पटेल या दोघांच्या वाहनांवरील दंडाची रक्कम या १५ दिवसांत वाढल्याचे समोर आले आहे.

नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर दंड आकारण्यासाठी ऑनलाइन पद्धत सुरू झाल्याने लोकप्रतिनिधी वापरत असलेली वाहनेही या कारवाईत येऊ लागली आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा, ऑनलाइन दंड करणाऱ्या मशीनमधून सहजपणे फोटो काढून दंड लावले जात आहेत.

त्यामुळे चालकांच्या नकळत ही कारवाई होते आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या वाहनांवर दंड आकारण्यात आला असून तो त्यांनी अद्याप भरला नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आता १५ दिवसांनंतर या संदर्भातील स्थिती जाणून घेतली असता दोन जणांच्या वाहनांवरील दंड वाढल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...