आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिय्या आंदाेलन:धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्याला मनसेचा विराेध

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दाेन्ही बाजूने असलेल्या समांतर रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणारे धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यावरून मंगळवारी वातावरण तापले हाेते. कारवाई सुरू असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदाेलन करत विराेध केला.

त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई अर्ध्यात बंद केली. पुराेहितांच्या माध्यमातून विधी पूर्ण करून पथकाने धार्मिक स्थळावरील पत्र्याचे शेड हटवले. तसेच ओटा ताेडण्यास सुरुवात केली. या दरम्यान मनसेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहर प्रमुख आशिष सपकाळे, राजेंद्र निकम, बंटी शर्मा आदी दाखल झाले. त्यांनी अतिक्रमण कारवाईला विराेध केला. धरणे आंदाेलन सुरू केल्याने पथकाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु मनसेचे पदाधिकारी एकायला तयार नसल्याने कारवाई थांबवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...