आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोर्‍या वाढल्या:रिक्षातून मोबाइल लांबवला,चालकाची माहिती असलेले स्टिकर नसल्यामुळे सुगावा नाही

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खेडी ते अजिंठा चौफुली या अवघ्या दोन किलोमीटर अंतरात एका रिक्षेत बसलेल्या तीन प्रवाशांनी सहप्रवाशाचा 10 हजार रुपयांचा मोबाइल लांबवला. सात जून रोजी सकाळी 10 वाजता ही घटना घडली. तर 8 जून म्हणजेच आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या रिक्षात चालक, मालकाचे नाव व नंबर असलेले स्टीकर चिकटवलेले नसल्यामुळे लुट झालेल्या प्रवाशाला रिक्षाचा नंबरही लिहुन ठेवता आला नाही.

हेमंत शंकरराव काळुंखे (वय 67, रा. खेडी) यांची लुट झाली आहे. काळुंखे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. दरम्यान, 7 रोजी सकाळी ते खेडी येथुन एका रिक्षेत बसले. यावेळी रिक्षेत तीन तरुण आधीच बसलेले होते. सुरूवातीला काळुंखे कॉर्नरला बसले होते.

काही अंतर पुढे आल्यानंतर तीन तरुणांनी धावत्या रिक्षेत मस्करी करायला सुरूवात केली. हिंदी भाषेत तीघे एकमेकांशी बोलत होते. याच मस्करीत त्यांनी काळुंखे यांना मध्यभागी बसायला सांगीतले. याच दरम्यान, तीघांनी त्यांच्या शर्टच्या शिखातील मोबाइल काढून घेतला. रिक्षेतून उतरुन अजिंठा चौफुलीच्या पुढे आल्यानंतर काळुंखे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी शोध घेतला परंतु, चोरटे सापडले नाही.

बातम्या आणखी आहेत...