आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान विभागाची माहिती:मुंबईतून ‘मान्सून’ एक्सप्रेस तिसऱ्याच दिवशी खान्देशात; के.एस. होसळीकर यांचे ट्विट

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दोन दिवस उशिराने मान्सून अखेर सोमवारी खान्देशात दाखल झाला. गुजरातच्या किनारपट्टीवरून खान्देशात दाखल झालेला मान्सून द्रोणीय स्थितीत मराठवाड्यातील परभणी, तिरूपती, पड्डूचेरीमार्गे बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे.

गुजरातच्या दक्षिणेतून त्याची उत्तरेत वाटचाल सुरू आहे. दरम्यान, मान्सूनचा वेग वाढला असून मुंबईतून अवघ्या तिसऱ्याच दिवशी मान्सून खान्देशात दाखल झाला आहे. याबाबत हवामान विभागाने अधिकृतपणे ही माहीती जाहीर केली आहे.

हवामान विभागाने 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता, त्याच वेळी खान्देशात 11 जूनपर्यंत मान्सून येणार असल्याचा अंदाज होता. मध्यंतरी मान्सून रेंगाळल्याने त्याचे आगमन लांबण्याची शक्यता होती. परंतु मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याचा वेग वाढला असून 11 ऐवजी 13 जून रोजी खान्देशात मान्सून दाखल झाला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी गुजरातमार्गे आगमन

मागील वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात गुजरातच्या किनारपट्टीवरून मान्सून दाखल झाला आहे. गुजरात, दक्षिण मध्यप्रदेशाचा काही भाग, नंदुरबार,धुळे आणि जळगाव मार्गे मान्सून मराठवाड्याकडे वळला आहे. विदर्भाला वळसा घालून पड्डूचेरी, तिरूपती आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये संपूर्ण विदर्भ व्यापून मान्सून मध्यप्रदेशातून पुढे जाईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. .

गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधी आगमन

गेल्या वर्षी मान्सून रेंगाळल्याने जुुलै महिन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. यावर्षी मात्र जून महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या वेळेत होण्याची शक्यता आहे. मुंबईत 11 जून रोजी तर जळगावात 13 जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच आता मान्सून दाखल झाल्याने पाऊस सलगपणे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने केली घोषणा

मान्सूनने गुजरातसह जळगाव, परभणी हे द्रोणीय क्षेत्र व्यापल्याचे पुणे येथील भारत हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी जाहीर केले आहे. पुढील दोन दिवसात संपुर्ण विदर्भात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

बातम्या आणखी आहेत...